नमस्कार मित्रांनो ,
माहिती तंत्रज्ञानाच्या या काळात जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहोचणे जितके सोपे झाले, तितकेच सोपे माणूस आणि माणुसकी विसरणे हि सोपे झालाय. या धावपळीच्या युगात स्वतःच्या आई बापाला विसरनेच इतक सोप झालाय तर आपल्या पूर्वजांचा आणि प्रचंड मोठ्या इतिहासाच्या आठवणी ठेवणे तर स्वप्नातही सुचणार नाही.
इतिहासाचा विषय निघालाच आहे तर आज त्या बद्दलच थोड लिहावास वाटल. खरतर बेंबीच्या देठापासून ओरडून जगाला सांगावस वाटतय, पण मी आधी बोल्लो ना जग धावपळीचे आहे तेव्हा मी काय सांगतोय आणि कशासाठी सांगतोय हे कोणाला ऐकायची इच्छा नसावी बहुधा. चारचौघात इतिहास विषयी बोलन थोड कमी पानाच वाटण हे काही नवीन नाही हा पण "Game Of thrones" सारख्या काल्पनिक विदेशी इतिहासाविषयी तासान तास बोलते अशा पिढीत जन्मल्या आल्याची मला लाज वाटतेय.
आज जाती आणि धर्मात विभागलेल्या समजा कडे पाहतो तेव्हा मन खिन्न होत. आज जो समाज विभागलेला आहे त्या मुळेच दीडशे वर्ष हा समाज पारतंत्र्यात होता. इंग्रजांनि या मायभूमीवर पाहिलं पूल टाकल ते १७५७ मध्ये पण त्या आधी आपला समाज हा एका सय्यमी, दृढनिश्चयी, महत्वाकांक्षी आणि पराक्रमी राजाच्या नेतृत्वाखाली जात, गोत्र, धर्म हे सार विसरून आपल्या राजाची इमाने-इतबारे सेवा करत होती. एखाद्या गोष्टीतल्या राजालाहि लाजवेल असा राजा आपल्या भूमीत अवतरून गेला. जगाला हेवा वाटावा असा राजा आपल्या भूमीत जन्माला आला, अरे स्वकीयांनी साथ दिली असती तर सात समुद्रापार भगवा झेंडा रोवून त्या ब्रिटीशांच्या छाती वर पाय देऊन हर हर महादेव अशी गर्जना ठोकली असती असा राजा आपल्याला लाभलेला याची तत्कालीन काही दरिद्री लोकांना कल्पनाहि नव्हती.
आयाबहिणींची अब्रू जिथे वेशी वर टांगली जात होती, लेकराबाळांच्या तोंडचा घास जिथे हिरावून घेतला जात होता, पाठीत वार करून जेव्हा स्वकीयच आपली मातृभूमी परकीयांना विकत होते आणि अशा अंधाऱ्या रात्री जेव्हा आशेने देवा पुढे हात जोडली जात तेव्हा ती देवलाही पडली जात होती. आशेच्या किर्नासाठी जेव्हा आपली रयत डोळे लाऊन बसली होती तेव्हा अतिशय विपरीत परिस्थितीत आशेची किरण म्हणून नव्हे तर तेजाचा गोळा बनून मासाहेब जीजाउंच्या उदरातून जन्म घेतला तो माझ्या शिवजी राजान. अरे चाहु बाजूने गनीम असतांना सह्याद्रीच्या कुशीत बसून दिल्लीतल्या बादशहाला घाम फोडणारा तो मराठा वाघ होता.
ह्या राजा बद्दल अगदी कमी माहिती ठेवणाऱ्या आपल्या तरुण पिढीला आणि आपल्या पोर बाळांना महाराजांच्या अस्तित्वाच्या, पराक्रमाच्या आणि दूरदृष्टीच्या कविता सांगण्यापेक्षा मोबाईल वर Twinkle Twinkle ऐकवणाऱ्या पालकांसाठी हा Blog आणि लवकरच YouTube channel घेऊन येत आहे. रक्तच पाणी झालेलं नसेल आणि आपल्या मातीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर ह्या माजुकुरास जास्तीत जास्त लोकांस वाचायला द्या.
धन्यवाद.
जय जिजाऊ जय शिवराय ....
चूकभूल माफ असावी.

Comments
Post a Comment