Posts

नमस्कार मित्रांनो , माहिती तंत्रज्ञानाच्या या काळात जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहोचणे जितके सोपे झाले, तितकेच सोपे माणूस आणि माणुसकी विसरणे हि सोपे झालाय. या धावपळीच्या युगात स्वतःच्या आई बापाला विसरनेच इतक सोप झालाय तर आपल्या पूर्वजांचा आणि प्रचंड मोठ्या इतिहासाच्या आठवणी ठेवणे तर स्वप्नातही सुचणार नाही. इतिहासाचा विषय निघालाच आहे तर आज त्या बद्दलच थोड लिहावास वाटल. खरतर बेंबीच्या देठापासून ओरडून जगाला सांगावस वाटतय, पण मी आधी बोल्लो ना जग धावपळीचे आहे तेव्हा मी काय सांगतोय आणि कशासाठी सांगतोय हे कोणाला ऐकायची इच्छा नसावी बहुधा. चारचौघात इतिहास विषयी बोलन थोड कमी पानाच वाटण हे काही नवीन नाही हा पण "Game Of thrones" सारख्या काल्पनिक विदेशी इतिहासाविषयी तासान तास बोलते अशा पिढीत जन्मल्या आल्याची मला लाज वाटतेय. आज जाती आणि धर्मात विभागलेल्या समजा कडे पाहतो तेव्हा मन खिन्न होत. आज जो समाज विभागलेला आहे त्या मुळेच दीडशे वर्ष हा समाज पारतंत्र्यात होता. इंग्रजांनि या मायभूमीवर पाहिलं पूल टाकल ते १७५७ मध्ये पण त्या आधी आपला समाज हा एका  सय्यमी, दृढनिश्चयी, महत्वाकांक्षी आणि परा...